Home अकोले अकोले: बेपत्ता विद्यार्थ्यांचा विहिरीत मृतदेह सापडला

अकोले: बेपत्ता विद्यार्थ्यांचा विहिरीत मृतदेह सापडला

अकोले: बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला

अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेणारा सौरभ माचीन्द्र सोनवणे हा विद्यार्थी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला होता. काल रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आढळा नदीपतरातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सौरभाचे वडील मच्छिंदर सोनवणे यांनी अकोले पोलिसांत दिनांक 13 फेब्रुवारीला तक्रार दिली होती. यावरून अकोले पोलिसांनी अज्ञात इसमविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सौरभ दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कुणाला काही न सांगता निघून गेला होता. त्याच्या मित्राने शाळा सुटल्यावर त्याचे दफ्तर शिक्षकाकडे दिले. त्यावेळी तो शाळेत नसल्याचा प्रकार लक्षात आला. यानंनतर त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

काल त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली असून लोकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचे अपहरण झाले होते का? त्याचा घातपात झाला का अशी चर्चा सध्या सुरू आहे. सौरभच्या मृत्यूचे गुड उलगडणे अकोले पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

पहा बातमीत -संगमनेर: अल्पवयीन मुलीचे अपहरण

Website Title: Akole news bodies of missing students were found


संपूर्ण बातम्यासाठी पहा: संगमनेर न्यूज व अकोले न्यूज 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here