Home अकोले अकोले: मनुष्याचे  चांगले विचार भविष्य घडवतात

अकोले: मनुष्याचे  चांगले विचार भविष्य घडवतात

मनुष्याचे  चांगले विचार भविष्य घडवतात- डॉ.अशोक डगळे

सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे येथे बारावीच्या विदयार्थांना निरोप.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – चांगल्यातला चांगुलपणा समजायला देखील अंगी चांगुलपणा असावा लागतो. म्हणूनच मणुष्याचे चांगले विचारच खऱ्या अर्थाने भविष्य घडवतात. असे प्रतिपादन डॉ.अशोक डगळे यांनी केले.
अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी डॉ.डगळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या प्रसंगि शालेय समितीचे अध्यक्ष दिनेश शहा, माजी विक्रीकर उपायुक्त मारुती डगळे, डॉ. खोकले, प्राचार्य अंतुराम सावंत, लिपिक भास्कर सदगिर, संपत धुमाळ, विक्रम आंबरे, रामदास डगळे, संजय देशमुख, एकनाथ डगळे, सुधिर पराड, सुभाष बेणके यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.डगळे पुढे बोलताना म्हणाले कि, थिगळाचे कपडे असायचे. विदयार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदरयुक्त भिती असायची.आता काळ बदलला. अनुभवातुनच माणूस घडतो असेही विचार प्रतिपादन केले.
दिनेश शहा यांनी शिक्षणाची गंगा गावात आली याचा सार्थ अभिमान व्यक्त करत स्पर्धत टिकायचे असेल तर प्रचंड मेहनत करा. चांगले नागरीक बना. गावाचे नाव उज्वल करा असे विचार प्रतिपादीत केले.
विक्रीकर उपायुक्त मारूती डगळे यांनी साधी राहणी उच्च विचारसरणी ठेवा, केस वाढून हिरो बनण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद बना. कलागुणांचा विकास करा, स्वतःला सिद्ध करा. उंच भरारी घ्या. आई, वडिल, गुरुजन यांच्या ऋणातुन उतराई होण्याचा प्रयत्न करा असे विचार प्रतिपादन केले.
डॉ. खोकले यांनी कोणतेही क्षेत्र निवडा परंतु त्यामध्ये प्राविण्य मिळवा. जिद्द, कष्टाला पर्याय नाही. असे मत व्यक्त केले.
या प्रसंगि प्राचार्य अंतुराम सावंत, कविता वाळुंज, प्रा. रामदास डगळे, प्रा. सचिन लगड, संगिता भांगरे, भास्कर सदगिर, पि.के. बेणके यांनीही आपले मनोगत व्यक्त करत परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.
विदयार्थ्यांच्या वतीने अनिरूद्ध डगळे, शंकर चंदगिर, नामदेव बेणके, सागर भांगरे, किरण बेणके, सिमा बेणके यांनी विदयालयाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयार्थी अनिरुद्ध डगळे याने केले.
सुत्रसंचालन विदयार्थीनी कोमल आवारी व योगिता बेणके यांनी केले. तर प्रा. सचिन लगड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Website Title: Sarvodaya vidya mandir Khirvire 12th student


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here