अकोले: विविध मागण्यांसाठी फोफसंडी गावातील ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा
अकोले: विविध मागण्यांसाठी फोफसंडी गावातील ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा
अकोले: अकोले तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या फोफसंडी येथील ग्रामस्थांनी गावात प्राथमिक सोयी सुविधांच्या मागणीसाठी सामुदायिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
स्वातंत्र्यापासून हे गाव प्राथमिक सोयी सुविधांपासून वंचित आहे. या मागण्यांसाठी गावाने अनेक वेळा निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र यातील बहुसंख्य मागण्या अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. वेळोवेळी केवळ आश्वासने ची बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्याचे निवेदन शासनाच्या विविध विभागाकडे दिलेले आहे. २५ फेब्रुवारी पर्यंत सदर मागण्या पूर्ण न झाल्यास २६ फेब्रुवारी पासून गावातील सर ग्रामस्थ हनुमान मंदिर येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी घोडेवाडी धरण बांधणे, सर्पदंश व साथीरोग नियंत्रणासाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, गावात पशुवैद्यकीय दवाखाना सुरु करणे, स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे, अहमदनगर व पुणे जिल्ह्याला जोडणारे रस्त्याचे बळकटीकरण करणे, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे, गावाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पोल वाढविणे आदी अनेक मागण्याचे निवेदन शासनाकडे दिले आहे.
Website Title: akole phopsandi people fast for primary demand
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436