अकोले: पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी १ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर
अकोले: पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी १ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर
अकोले: सरकारच्या उदासीन धोरणामुळे पट्टाकिल्याच्या कामासाठी निधी न मिळाल्यामुळे काम काही ठप्प झाले होते. मात्र याबाबत अधिवेशनात आवाज उठवून सतत पाठ पुरावा केल्यामुळे १ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीने पर्यटन विकासाला चालना मिळेल व पत्ता किल्याचे सुशोभीकरण करण्यात येईल तसेच पुढील काळात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभामंडपाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारून चांगले स्मारक तयार करू असा विश्वास आ. वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.
अकोले तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या विश्रामगड (पट्टाकिल्ला) येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवयात्रा कार्यक्रम प्रसंगी आ.पिचड बोलत होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर, राजूरच्या आदर्श सरपंच हेमलता ताई पिचड, एटीएस चे अध्यक्ष जे.डी. आंबरे, सचिव यशवंतराव आभाळे, मीनानाथ पांडे, प्राचार्य भास्करराव शेळके, अगस्तीचे संचालक अशोक देशमुख, विक्रम नवले आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. पिचड म्हणाले कि, शिवाजी महाराजांनी स्वाभिमान व आत्मबलिदान शिकविले. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे,स्वतः चे राज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होते.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की, कष्टकर्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काम केले. म्हणूनच लोककल्याणकारी राजे होते. त्यामुळेच महाराष्ट्र घडला. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या व स्वराज्याची निर्मिती करा अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
Website Title: Patta Killa Akole A grant of Rs 1.44 crore is approved
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 3000/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436