Home अकोले अकोले: अकोले भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास मारहाण गुन्हा दाखल

अकोले: अकोले भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास मारहाण गुन्हा दाखल

अकोले: अकोले भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास मारहाण गुन्हा दाखल

अकोले: जमिनीची मोजणी करण्यास गेलेल्या रवींद्र अंकुश पवार वय ४२ अकोले भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापकास व त्यांच्या अन्य दोन सहकारी यांना मारहाण झाल्याप्रकरणी राजूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्त अकोले भूमीअभिलेख कार्यालयातील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले.

याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी कि, अकोल्यातील उप अधीक्षक, भूमी अभिलेक कार्यालयातील भूकर मापक रवींद्र पवार यांनी राजूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पुढे असे म्हंटले आहे कि, तालुक्यातील जागीरदार वाडी शिवारातील सर्व्हे नं. १७/१ हे क्षेत्र मोजणीसाठी श्री पवार व त्यांचे सहकारी कनिष्ठ लिपिक नितीश सुनील हंडोरे, शिपाई शांताराम दत्तात्रय उगले हे मोजणी करणे कामी गेले असता लगतचे क्षेत्र धारक आरोपी नवनाथ नागू खाडे, चंदर बाळू भागडे, ज्ञानेश्वर चंदर भागडे हे तिथे आले असता मोजणी करू नका असे म्हणत काही वेळासाठी मोजणी थांबवली नंतर  आरोपींनी मोजणी अर्जदार राम गंगा झोले व त्यांची पत्नी मीराबाई , मुलगा विष्णू यांच्या बरोबर वाद केला व नंतर फिर्यादी पवार व त्यांचे सहकारी यांना मोजणी करायला कसे काय आलात असा प्रश्न विचारात त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला मोजणी करू दिली नाही अशी तक्रार राजूर पोलिसांत दिल्यानंतर आरोपी नवनाथ नागू खाडे, चंदर बाळू भागडे, सुधीर चंदर भागडे, ज्ञानेश्वर चंदर भागडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Website Title: Akole Land Record The employee murder case


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 3000/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here