Home अकोले अकोलेत शिवसैनिकांच्या दोन गटांत वाद होऊन राडा

अकोलेत शिवसैनिकांच्या दोन गटांत वाद होऊन राडा

अकोलेत शिवसैनिकांच्या दोन गटांत वाद होऊन राडा

अकोले: अकोले येथे शुक्रवारी शिवसेनेच्या बैठकीत नव्या जुन्या शिवसैनिकांचा वाद उफाळून आला. तळपाडे धुमाळ यांनी एकमेंकांवर आरोप प्रत्यारोप केले. हा संपूर्ण वाद संपर्क प्रमुख आ. नरेंद्र दराडे यांच्या समोरच झाला.

पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी थांबविण्यासाठी व तालुक्यात ३५ वर्षापासून सेनेची ताकद असताना सेनेचा आमदार होत नसेल तर तालुका प्रमुखाने राजीनामा द्यावा. मग २०१९ ला सेनेचा उमेदवार निवडून येईल असे मधुकर तळपाडे यांनी स्पष्ट केले. तर सेनेत नव्याने आलेल्या गद्दारांच्या टोळीमुळेच सेनेचा तालुक्यात आमदार होऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षात पंचायत समितीच्या सभापती उप सभापतीने सेनेच्या तालुका पदाधिकार्यांना एकदाही विश्वासात घेतले नाही, असा आरोप तालुका सेना प्रमुख धुमाळ यांनी केला आहे.

या दोघांतील वादाचे कारण तालुक्यात नव्याने झालेल्या पदाधिकारी निवडी असल्याचे बोलले जाते. दोन वर्षापूर्वी पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सेनेने सत्ता ताब्यात घेतली, यावेळी दोन गटांत संघर्ष झाला होता. तीच खदखद शुक्रवारी पुन्हा एकदा उफाळून आली.

बैठकीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप प्रत्यारोप केले. सेनेच्या तालुका प्रमुखांवरच थेट निशाना साधत टीका करण्यात आली. दरवेळी सेनेचा नवीन उमेदवार उभा करून अप्रत्यक्षपणे सेनेच्या तालुका प्रमुखांकडून राष्ट्रवादीला मदत केली जाते असा आरोप मधुकर तळपाडे यांनी केला. तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी बदलल्यास २०१९ ला सेनेचा आमदार होईल असा विश्वास तळपाडे यांनी व्यक्त केला.

Website Title: Akole Shivsena dispute between two groups


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 3000/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here