Home अकोले अकोले येथे  खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला

अकोले येथे  खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला

अकोले येथे  खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला

अकोले: राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, तर या मतदारसंघात कोणीही अपक्ष उमेदवार उभा राहणार नाही असेही ठाम मत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

          अकोले येथे  खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा महालक्ष्मी मंगल कार्यालयात पार पडला.तेव्हा राज्यमंत्री भुसे बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आ. नरेंद्र दराडे, भाजप जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष  सचिन तांबे, अशोकराव भांगरे, जिप सदस्य डाॅ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, सुषमा दराडे, सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेेंगाळ शिवाजीराव धुमाळ, वसंत मनकर, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, पंस सदस्य अलका अवसरकर, सतीष भांगरे, रामहरी तिकांडे,  यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        ना भुसे बोलताना पुढे म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेवू नका. उमेदवार बदलला जाणार नाही. तसेच साईबाबां बरोबरच मतदार व अदृश्य शक्तींचा हात खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरेल असा ठाम विश्वासही  त्यांनी मतदारांना दिला.मंत्री भुसे यांनी महायुतीने केलेल्या कामांचा आढावा घेताना भविष्यात करावयाची कामांची यादी मतदारापुढे सादर केली. आमच्या शिवसेनेच्या रक्तात दोष नाही. ही गद्दारी करण्याचा आमचा धर्म नाही. स्वभाव नाही असा निर्वाळा देऊन मंत्री भुसे यांनी विरोधक पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत सतत हेटाळणी करत असतात याकडे लक्ष वेधले. मात्र पुलवामा घटनेनंतर त्यांच्या परदेश दौऱ्याचे फलित म्हणून चीन वगळता सर्वच जगातील देशांनी भारताला पाठिंबा दिला. याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मुंबई हल्ला ज्यांच्या काळी झाला त्यांनाच पुलवामा घटनेचा बदला पंतप्रधानांनी कसा घेतला हे पाहण्यास मिळाले असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ही निवडणूक ग्रामपंचायतीची नसून लोकसभेची आहे हे असे स्पष्ट करून राज्यमंत्री भुसे म्हणाले की मालेगाव विधानसभा मतदार संघाला जितका विकास निधी आपण दिला तितकाच भविष्यामध्ये अकोल्याला देऊ अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. 
          आमदार दराडे यांनी  शिवसेनेचाच आमदार येथे होईल त्यासाठी गद्दारांना पक्षात थारा नाही असे सांगून तालुक्यातील  चांगले काम व प्रश्नासाठी मी बरोबर असेल अशी ग्वाही दिली तर खासदार लोखंडे यांनी त्यांच्या विकासकामांचा आढावा घेतला आगामी काळात करावयाच्या विकास कामांची पंचसूत्री त्यांनी जाहीर केली व आपण ‘ओरिजिनल माणूस’ असून रंगरंगोटी करणारा नाही असा टोला त्यांनी केस रंगवणाऱ्या आणि आणि आपले खरे रुप लपवणाऱ्या आपले प्रतिस्पर्धी भाऊसाहेब वाकचौरे व आ. भाऊसाहेब कांबळे यांचे नाव न घेता टोला लगावला.
   यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, अगस्ती चे संचालक महेश नवले रमेश राक्षे, संदीप यादव  यांची यावेळेस भाषणे झाली. स्वागत व प्रास्तविक शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले. भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी आभार मानले.

Website Title: Akole promotion of Sadashivrao Lokhande


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.


आपल्या बिझनेसची जाहिरात करा ऑनलाईन. आपल्या बिझनेस, संस्था, दुकान, न्यूज ची वेबसाईट बनवा अत्यल्प दरात. आजच संपर्क करा. मोबा. 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here