Home अकोले राजूर: शिष्यवृत्तीमुळे आदिवासी मुले आपली शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावर नेतात सचिव.टी.एन.कानवडे

राजूर: शिष्यवृत्तीमुळे आदिवासी मुले आपली शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावर नेतात सचिव.टी.एन.कानवडे

राजूर: शिष्यवृत्तीमुळे आदिवासी मुले आपली शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावर नेतात सचिव.टी.एन.कानवडे

ललित मुतडक राजूर प्रतिनिधी -जीवनात कष्टाला पर्याय नाही; श्रीमती केसरकर.
 यश मिळवण्यासाठी कोणताही शॉट कट नाही,कठोर परिश्रम करा नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा.असे प्रतिपादन हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वेस्ट झोनचे प्रशासकीय अधीकारी श्रीमती विनंती केसरकर यांनी व्यक्त केले ऍड एम एन देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,राजूर येथे SC /ST /OBC/ PWD विद्यार्थ्यांना सोळा लाख एकोणसाठ हजार तीनशे रुपयांची शिष्यवृत्ती धनादेश प्रदान प्रसंगी त्या बोलत होत्या. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ही जगातील नामांकित कंपनी असून ती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाचे सहकार्य करते. या प्रसंगी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे टर्मिनल मॅनेजर चौधरी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रसंगी ते म्हणाले की,आदिवासी भागातील मुलांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आपला शैक्षणिक विकास करावा त्यांनी ही स्पर्धा परीक्षेच्या युगात  यश संपादन करावे.मोठया पदावर नोकरी करावी असेही मत व्यक्त केले.
       शैक्षणिक वर्ष २०१८- १९मध्ये महाविद्यालयातील बीए,बी एस-सी,बी-कॉम,एम एस सी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू अशा तीनशे सहा विद्यार्थ्यांना या प्रसंगी शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी जगातील एक आग्रगण्य कंपनी असून ती आदिवासी भागात मानवतावादि दृष्टिकोनातून काम करीत असून या शिष्यवृत्ती मुळे आदिवासी मुले आपली शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावर नेत आहे.असे मत सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.टी.एन.कानवडे यांनी व्यक्त केले.या वेळी ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे प्रा.एल.बी.काकडे, प्रा.तेलोरे.
बी.एच,सुरज साबळे यांचा ही गौरव करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी मा.श्रीरामशेठ पन्हाळे, मा.एस.टी.येलमामे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.देशमुख उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी.टी.करंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.व्ही.एन.गिते यांनी केले.

Website Title: academic progress to the scholarship T N Kanawade


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here