Home अकोले Akole: अकोले तालुक्यात तब्बल १४ जण करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात तब्बल १४ जण करोनाबाधित

Akole taluka 14 coronavirus infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शासकीय व खासगी प्रयोगशाळेतून तब्बल १४ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कारखाना रोड येथील सामाजिक कार्यकर्त्याच्या कुटुंबात पाच व्यक्ती करोना बाधित आढळून आल्या आहेत.

आज अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात एका सामाजिक कार्यकार्त्यासह त्याच्या कुटुंबातील ६०, ३३ वर्षीय पुरुष, ५५, ३० वर्षीय महिला व आठ वर्षीय लहान मुलीला करोनाची बाधा झाली आहे.

तालुक्यातील उंचखडक येथील ४७ वर्षीय महिला, सहा वर्षाचा बालक, सुगाव येथे २७ वर्षीय तरुण, शेरणखेल येथे ५० वर्षीय पुरुष, बांगरवाडी येथे २५ व १९ वर्षीय तरुण करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.

खासगी प्रयोगशाळा अहवालात ३६ वर्षीय पदाधिकारी, शाहूनगर येथे ७८ वर्षीय पुरुष, मोग्रस येथे ६० वर्षीय पुरुष अशा १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka 14 coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here