Home महाराष्ट्र तर मग त्यांना आम्ही ठोकून काढणार: मनसेचा सरकारला इशारा

तर मग त्यांना आम्ही ठोकून काढणार: मनसेचा सरकारला इशारा

MNS Leader Sandip Deshpande statement

मुंबई | MNS: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबईतील चाकरमाणी उत्सुक आहेत. मात्र ई पासचा काळाबाजार सुरु आहे. चाकरमान्यांची फसवणूक करणाऱ्या दलालांना ठोकून काढणार असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

ई पाससाठी सर्व सामान्य व्यक्तींने अर्ज केल्यास त्याला पास सहजासहजी मिळत नाही मात्र दलालाने अर्ज केल्यास सहज पास मिळतो, ई पासचा काळाबाजार राज्यात सुरु आहे असा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

वारंवार ई पाससाठी अर्ज करूनही पास नामंजूर केला जात असल्याने कोकणवासीय संतप्त झाले आहेत. गणेशोत्सवसाठी गावी जायला मिळणार की नाही, याबाबत कोकणवासीय चिंतेत पडले आहे.  

संदीप देशपांडे यांनी ट्विटर ऑडिओ क्लिप पोस्ट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. या क्लिपमध्ये दलालाकडून पास घेण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. राज्यसरकारने ई पासची दलाली करण्यावर कठोर कारवाई अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: MNS Leader Sandip Deshpande statement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here