Home महाराष्ट्र आदित्य ठाकरेंचा सोशियल मेडीयावर व्हायरल फोटो, फोटोमधील तरुणी रिया चक्रवर्ती तर नव्हे

आदित्य ठाकरेंचा सोशियल मेडीयावर व्हायरल फोटो, फोटोमधील तरुणी रिया चक्रवर्ती तर नव्हे

Aditya Thackeray's viral photo

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा कारमध्ये एका तरुणीसोबत फोटो सोशियल मेडीयावर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे.

काही युजर्सना असे वाटते की, ती तरुणी रिया चक्रवर्ती आहे. पण ती तरुणी रिया चक्रवर्ती नसून ती अभिनेत्री दिशा पटानी आहे. एक वर्षभरापूर्वी आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी मुंबईमध्ये रेस्टॉरंटला जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा काढलेला फोटो आता व्हायरल होतो आहे.

हा इतका जुना फोटो व्हायरल होतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप त्याचे घरचे करत आहे. मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस कसून चौकशी करत आहे. सुशांतच्या काही चाहत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सोशियल मेडीयावर काही युजर्स दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्र असलेला गाडीतील फोटो पोस्ट करून ती तरुणी रिया असून तिची आदित्य ठाकरेसोबत मैत्री आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआय कडे देत नसल्याचा तर्क लावीत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी सर्वात प्रथम रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलाविले होते.       

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Aditya Thackeray’s viral photo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here