Home महाराष्ट्र धक्कादायक: लिफ्ट बहाण्याने महिलेला अज्ञातस्थळी नेऊन बलात्कार करून एक लाखाचे दागिने लुटले

धक्कादायक: लिफ्ट बहाण्याने महिलेला अज्ञातस्थळी नेऊन बलात्कार करून एक लाखाचे दागिने लुटले

Pune woman to an unknown place, raped her and looted

पुणे | Pune: एका ४५ वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला तर महिलेचे एक लाखाचे दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात राजेश कांबळे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी महिला घरकाम करते. ती राहण्यास सांगवी परिसरात आहे. ही महिला सकाळी आठ वाजेच्या सुमारास कामानिमित जाण्यासाठी फातिमा बस टॉपवर उभ्या होत्या.  त्यावेळी अनोळखी व्यक्ती तेथे आली. त्याने तुम्हाला लोणी परिसरात सोडतो असे सांगितले. त्यांनंतर फिर्यादी गाडीवर बसल्या.

त्यांनतर त्या नराधमाने ऑफिस दाखविण्याच्या बहाण्याने मुंढवा परिसरात नेले. तसेच सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगितले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. काढून ठेवलेले दागिने घेऊन फरार झाला. ही घटना झाल्यानंतर पिडीत महिलेने नियंत्रण कक्षाला फोन केला. व माहिती सांगितली. त्यांनतर त्या हडपसर पोलीस ठाण्यात गेल्या. त्याठिकाणी माहिती घेऊन मुंढवा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास मुंढवा पोलीस करीत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Pune woman to an unknown place, raped her and looted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here