Akole: अकोले तालुक्यात आज १८ व्यक्ती कोरोना बाधित
अकोले: आज बुधवारी तालुक्यातील १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आले आहेत. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५७५ झाली आहे .
शहरात कारखाना रोड व देवठाण रोड,पेट्रोल पंपाजवळील व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात तालुक्यातील ११ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये शहरातील देवठाणरोड वरील ४१ वर्षीय पुरूष, धामणगाव आवारी येथील ३७ वर्षीय महीला, गर्दणीतील ५८ वर्षीय महीला, ३२ वर्षीय महीला, कुंभेफळ येथील ३९ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय महीला, ५२ वर्षीय महीला, ५३ वर्षीय महिला, २१ वर्षीय तरुण, कळस येथील ४८ वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील ६८ वर्षीय पुरुष अशा ११ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.तर तालुक्यात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्ये शहरातील कारखानारोड वरील ३१ वर्षीय महीला ,ब्राम्हणवाडा येथील ६० वर्षीय महीला, २३ वर्षीय महीला, व ०९ महिन्याचा लहान मुलगा अशी ०४ व्यक्ती पॅाझिटीव्ह आली तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात धुमाळवाडी येथील ६२ वर्षीय पुरूष, कळस येथील ३८ वर्षीय पुरूष, शहरातील पेट्रोल पंपाजवळील ५८ वर्षीय पुरूष अशा तीन व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
पत्रकार: अल्ताफ शेख, अकोले
Web Title: Akole taluka 18 corona infected today