Coronavirus: संगमनेर तालुक्यात ४२ जण बाधित तर एकाचा मृत्यू
संगमनेर | Coronavirus: संगमनेर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी प्राप्त अहवालात ४२ जण करोनाबाधित आढळून आले तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याची करोनाबाधितांची संख्या १७६२ इतकी झाली आहे.
संगमनेर शहरातील माळीवाडा येथे बाधित आढळून आलेल्या ७० वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या शासकीय अहवालात २४ जण करोनाबाधित आढळून आले आहेत यामध्ये इंदिरानगर येथे ३३ वर्षीय महिला, माळीवाडा येथे ५१ वर्षीय पुरुष, कनोली येथे ६० वर्षीय, ४६ वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी येथे ३८ वर्षीय महिला, रहिमपूर येथे २,४ वर्षीय बालक, ६ वर्षीय मुलगी, ६०,३८,३४ वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे ५४ वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथे ९१ वर्षीय वृद्ध, ६२, ३४, ३३, २७ वर्षीय पुरुष, ५५,३३,२३,२२ वर्षीय महिला, ६ वर्षीय बालक, कुरकुटवाडी येथे ६१ वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ५५ वर्षीय व्यक्ती बाधित समोर आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेतून १८ बाधित आढळून आले आहेत यामध्ये साईबन कॉलनी ५२ वर्षीय महिला, ३० वर्षीय तरुण, कुंभारआळा येथे ३० वर्षीय पुरुष, गोविंदनगर येथे ३६ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ५२,३७ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ३१ वर्षीय महिला, नाईकवाडपुरा येथे ५१ वर्षीय पुरुष, बाजारपेठ परिसरातील ५२ वर्षीय पुरुष बाधित झाले आहेत. तालुक्यात घारगाव येथे ६१ वर्षीय पुरुष, माळेगाव पठार ३३ वर्षीय तरुण, पिंपरणे येथील २४ वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील ६७ वर्षीय पुरुष, धांदरफळ येथील ३२ वर्षीय पुरुष, दाढ खुर्द येथे ५३ वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ४३ वर्षीय तरुण , जाखुरी येथील ५९ वर्षीय व्यक्ती, चिंचोली गुरव येथे ५२ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Coronavirus Sangamner taluka 42 patient one death