अकोले तालुक्यात मंगळवारी २६ करोना रुग्ण आढळले
अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात २६ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ३५२१ वर पोहोचली आहे.
अकोले तालुक्यातील प्राप्त झालेल्या अहवालात कोतूळ येथील ४५ वर्षीय पुरुष, गणोरे येथील ८८ वर्षीय पुरुष, अकोले येथे ५० वर्षीय पुरुष, ढोकरी येथे ६१ वर्षीय पुरुष, अंभोळ येथे ४७ वर्षीय महिला, समशेरपूर येथे ६५ वर्षीय महिला, वारांघुशी येथे ५९ वर्षीय पुरुष, कळस बुद्रुक येथे ५० वर्षीय पुरुष, कळस खुर्द येथे ३७ वर्षीय पुरुष, राधानगरी कॉलनी अकोले येथे ४७ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे ३ व ६२ वर्षीय महिला, परखतपूर येथे १२ वर्षीय पुरुष, रतनवाडी येथे ७१ वर्षीय महिला, गुहिरे येथे ७१ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे ३८ व १० वर्षीय पुरुष, अगस्ती कारखाना रोड अकोले ७८ वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे ५४ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ६३ वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे ३१ वर्षीय पुरुष, जाचकवाडी येथे ५२ वर्षीय पुरुष, राजूर येथे २५ वर्षीय तरुण, अकोले येथे ३० वर्षीय पुरुष, औरंगपुर येथे ३१ वर्षीय पुरुष असे २६ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Taluka 26 Corona Positive Today