Home Suicide News संगमनेर: सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner Woman committed suicide by hanging herself

संगमनेर | Suicide: संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात काल सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अलमास नकीर सय्यद रा. इदगा रोड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आपली मोठी मुलगी नुरेन हिवा विवाह २०१८ साली शहरातील कोल्हेवाडी रोड येथील रियाज नवाब इनामदार यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर तिसर्या महिन्यातच सासरच्या मंडळीनी छळ करण्यास सुरुवात केली. लग्नात चांगले फर्निचर घेतले नाही. या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून पुन्हा पुन्हा नांदायला येऊ नको असे सासरच्यांनी सांगितले. याच त्रासाला कंटाळून नुरेण ही २० डिसेंबर २०२० रोजी तिच्या लहान बाळासह घरी आली. सासरच्या लोकांनी पुन्हा त्रास देणार नाही असे सांगून नुरेण हिला पुन्हा सासरी नेले. त्यानंतर त्यांनी तिचा छळ सुरु ठेवला. २२ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नुरेन हिने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत अलमास नकीर सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रियाज नवाब इनामदार, राशद नवाब इनामदार, इब्राहीम बालम शेख सर्व रा. कोल्हेवाडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Sangamner Woman committed suicide by hanging herself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here