Home संगमनेर संगमनेरात महिलेचा खून, दोन तासांतच खुनाचा उलगडा

संगमनेरात महिलेचा खून, दोन तासांतच खुनाचा उलगडा

Sangamner Crime Murder of Women 

संगमनेर: संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मल्हारवाडी कर्हे शिवारात चारी क्रमांक ४ येथे २२ मार्च रोजी दुपारी एक वाजता भाऊपाटील शंकर सानप यांच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे अशी माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी आपल्या पथकासह धाव घेत माहितीची शहानिशा करून वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली.

या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असता महिला मंगल वामन पथवे वय ४५ रा. उंचखडक हल्ली रा. कर्हे शिवार संगमनेर ही महिला राजू शंकर कातोरे यांच्यासह रामदास म्हातारबा सानप रा. कर्हे यांची शेती वाट्याने करीत असल्याची माहिती मिळाली. मयत महिलेबाबत राजू शंकर कातोरे यानेच पोलिसांना फोनवरून कळविले. सखोल तपास करता तसेच पोलीस श्वान पथकाची मदत घेऊन सदर महिलेचा खून राजू शंकर कातोरे यानेच केला असल्याचे उघडकीस आले असून संगमनेर पोलिसांनी केवळ २ तासांतच सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर घटनेवरून आरोपी राजू शंकर कातोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहे. पोलिसानी कौतुकास्पद कामगिरी केल्याने नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Sangamner Crime Murder of Women 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here