संगमनेर तालुक्यातील या गावांत आढळून आले नवे करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात ११ तर ग्रामीण भागातून ९ असे एकूण २० जण करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या ४१२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून ४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संगमनेर शहरात विद्यानगर येथे ४४ वर्षीय पुरुष, सुयोग सोसायटी ४१,३६ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, अकोले बायपास रोड ४३ वर्षीय महिला, मैत्री होस्टेल जवळ २७ वर्षीय महिला, मालदाड रोड येथे २२ वर्षीय पुरुष, ४१ व १६ वर्षीय महिला, पावाबाके रोड ५२ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ५२ वर्षीय पुरुष असे ११ जण बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून घुलेवाडी येथे ५८ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ६२ वर्षीय पुरुष, साकुर येथे ४८,३२ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे ४० वर्षीय महिला, निमज येथे ३० वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथे २९ वर्षीय महिला, वडगाव पान येथे ५१ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ५५ वर्षीय पुरुष असे ९ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka Villages Found 9 corona Positive