Home अकोले Akole: अकोले तालुक्यातील बाधितांचा आज उच्चांकी २७ करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यातील बाधितांचा आज उच्चांकी २७ करोनाबाधित

Akole Taluka 27 corona infected today

अकोले | Akole: शहरातील महालक्ष्मी कॉलनीत तब्बल ०५, धुमाळवाडीत पुन्हा ०६ तर ब्राम्हणवाडा येथे तब्बल १४ सह तालुक्यात एकुण २७ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ४०८ इतकी झाली आहे.

आज सोमवारी सकाळी  खानापुर कोविड सेंटर येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये तालुक्यातील १३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. यामध्ये शहरातील महालक्ष्मी कॉलनीत २१ वर्षीय पुरुष ५० वर्षीय पुरूष, ७५ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महीला, ४६ वर्षीय महीला, तर धुमाळवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष,  ४५वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महीला,  ६५ वर्षीय महीला, १७ वर्षीय तरुण,  ५ वर्षाची लहान मुलगी, रेडे येथील ५६ वर्षीय पुरूष, व पैठण(अंभोळ) येथील ४३ वर्षीय पुरुष अशा एकूण  १३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.

तर ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या २४ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये तब्बल १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये ब्राम्हणवाडा येथील ६० वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय पुरुष, ४३वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय पुरुष, ६६ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय पुरुष, ५३वर्षीय पुरुष, १८ वर्षीय तरुण, ८५  वर्षीय महीला, ५८ वर्षीय महीला, २७ वर्षीय महीला, १८ वर्षीय तरुणी अशा १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने तालुक्यातील एकुण २७ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आढळा विभागातील देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात आज टेस्ट घेण्यात आल्या नाहीत तर कोतुळ ग्रामीण रूग्णालयात ०५ टेस्ट घेण्यात आल्या या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ४०८  झाली आहे. त्यापैकी ३०२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर १० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या ९६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

पत्रकार: अल्ताफ शेख 

See Latest Marathi News

Web Title: Akole Taluka 27 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here