Akole: अकोले तालुक्यात आज २९ व्यक्ती कोरोना बाधित

अकोले | Akole: तालुक्यात आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये राजुर येथील १८ व्यक्तीसह २४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.
यामध्ये राजुर येथील ६९ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय तरुण, २२ वर्षीय तरुण, १७ वर्षीय तरुण, ११ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगा, ५:५वर्षीय मुलगा, ४० वर्षीय महीला, २१ वर्षीय महीला, २५वर्षीय महीला, ५५ वर्षीय महीला, ३८ वर्षीय महीला, ३० वर्षीय महीला, १७ वर्षीय युवती, १२ वर्षीय मुलगी तर वाशेरे येथील ४० वर्षीय महीला, नवलेवाडी येथील ५५ वर्षीय महीला, अकोले शहरातील कारखाना रोडवरील ३९ वर्षीय पुरुष, पिंपळवंडी (ब्राम्हणवाडा) येथील २६ वर्षीय तरुण, ब्राम्हणवाडा येथील ३० वर्षीय महीला,१५ वर्षीय युवक अशी २४ व्यक्ती ॲन्टीजन मध्ये पॅाझिटीव्ह आले.
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात कोतुळ येथील ४० वर्षीय महीला,चास येथील ८० वर्षीय पुरूष, कोभांळणे येथील ४२ वर्षीय पुरुष अशी ३ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज तालुक्यात २७ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
आज खासगी प्राप्त अहवालात नवलेवाडी येथील ३३ वर्षीय पुरुष तर धुमाळवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ६३६ झाली आहे. त्यापैकी ५२८ व्यक्ती उपचार करुन बरे होऊन घरी गेले व ११ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर ९८ व्यक्तीवर उपचार सुरु आहे.
Web Title: Akole Taluka 29 corona infected today
















































