Rajur: राजूरमध्ये आज १८ करोनाबाधितांसह तालुक्यात २७ रुग्ण
अकोले | Rajur: अकोले तालुक्यातील राजूर येथे आज तब्बल १८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राजूर नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच तालुक्यात आज २७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. कोतूळ, वाशेरे, नवलेवाडी, अकोले, पिंपळवंडी, ब्राम्हणवाडा, चास, कोंभाळणे येथे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
आज शनिवारी प्राप्त अहवालात कोतूळ येथील ४० वर्षीय महिला, राजूर येथे ६९,२८, ३७,४३,१७,३३,२२,११,५,५, पुरुष बाधित आढळून आले आहेत. तर ४०, २१,२५,५५,३८,१७,३०,१२ वर्षीय महिला असे १८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. वाशेरे येथे ४० वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ५५ वर्षीय महिला, अकोले शहरात ३९ वर्षीय पुरुष, पिंपळवंडी येथे २६ वर्षीय तरुण, ब्राम्हणवाडा येथे ३० वर्षीय महिला तर १५ वर्षीय मुलगा, चास येथे ८० वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथे ४२ वर्षीय पुरुष असे तब्बल २७ करोनाबाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Rajur 18 corona infected