Home अकोले नागरिकांच्या बेशिस्तीपणात वाढ, संगमनेरात एकाच दिवशी ८० रुग्ण

नागरिकांच्या बेशिस्तीपणात वाढ, संगमनेरात एकाच दिवशी ८० रुग्ण

Sangamner Taluka 80 corona infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर व अकोले तालुक्यात करोनाने हैदोस घातला आहे. करोना वाढण्याचे मूळ कारण आपण पहाल तर बेशिस्तीपणाचा कळस गाठला आहे. वाढदिवस, पार्ट्या, सोहळे करण्याची लोकांना सध्या गरज वाटते. त्यांना माणुसकी महत्वाची आहे पण समाजहित नको. समाजाच्या हितासाठी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत नाहीतर घराघरात करोनाचा शिरकाव झाल्याशिवाय राहणार नाही. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येण्यापेक्षा अगोदरच सावध राहिले पाहिजे. प्रशासन किती दिवस आपल्याला उपदेश करीत बसणार आहे. तालुक्यात दिवसेंदिवस संख्या वाढण्याचे कारण मास्क न वापरणे, बेजबाबदारपणा, काय होतंय अशी भावना मनात असणे, वाढदिवस, पार्ट्या, सोहळे करणे त्यामुळे जागे व्हा आपणच आहोत आपल्या जीवानाचे व समाजहिताचे शिल्पकार! घरी बसा सुरक्षित राहा.

संगमनेर तालुक्यात शुक्रवारी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल ८० बाधित आढळून आले आहेत. बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील माळीवाडा येथे  45 व 18 वर्षीय महिलांसह 21 वर्षीय व 18 वर्षीय तरुण, जनतानगर येथे 41 वर्षीय तरुण, वाडेकर गल्ली येथे 27 वर्षीय तरुण, गणेशनगर येथे 75 व 60 वर्षीय महिला, साई श्रद्धा चौकातील 60 वर्षीय पुरूषासह ४४ व 42 वर्षीय तरुण, बाजारपेठ येथे 31 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 36 वर्षीय तरुण, मालदाड रोड येथे 32 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुणांसह ९ वर्षीय बालिका, तसेच 58 वर्षीय महिला, 36 वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आले आहे.

तालुक्यातील घुलेवाडी येथे 50 व 47 वर्षीय व्यक्ती व 43 वर्षीय महिला, तसेच १० वर्षीय बालिका, कौठे धांदरफळ येथे 50 वर्षीय महिला व 50 वर्षीय व्यक्ती,  रायते येथील 68, 45, 38, 35, 21 व १७  वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण व ६ वर्षीय बालिका, चिखली येथे 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कनोली येथे 42 वर्षीय तरुण, चिंचपूर येथे 57 वर्षीय व्यक्ती 24 वर्षीय महिला, वाघापूर येथे 59 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 10 वर्षीय बालक, चंदनापुरी येथे 39 व 25 वर्षीय येथे येथील 50 वर्षीय इसम, निमोण येथे 90 वर्षीय वयोवृद्धासह ३० वर्षीय महिला, ढोलेवाडी येथे 38 वर्षीय तरुण, चिकणी येथे 58 वर्षीय इसमासह 26 वर्षीय महिला, बोरबन येथे ९ वर्षीय बालक, कुरकुटवाडीतील 55, 48 व 43 वर्षीय महिला तसेच 45, 28 व 26 वर्षीय तरुण, माळवाडीतील 74, 48 व २५  वर्षीय महिलांसह 52, 48, 28, 18 वर्षीय पुरुष, १ वर्षीय बालक तसेच ३ वर्षीय बालिका, कोठे बुद्रुक येथील 80 वर्षीय वयोवृद्ध महिलेसह 35 व 17 वर्षीय महिला व 40 वर्षीय तरुण, माळेगाव पठारावरील 60 व 21 वर्षीय महिला, मनोली येथे एकूण 70 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला तसेच 35 वर्षीय तरूण व 13 वर्षीय बालक, तसेच कोल्हेवाडीतील 41 वर्षीय व 37 वर्षीय तरुणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्याच्या रुग्णसंख्येत भयानक वाढ झाली आहे. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १८९५ इतकी झाली आहे.

Web Title: Sangamner Taluka 80 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here