Home अकोले अकोलेकरांसाठी दिलासादायक बातमी: आज तालुक्यात केवळ दोन करोनाबाधित

अकोलेकरांसाठी दिलासादायक बातमी: आज तालुक्यात केवळ दोन करोनाबाधित

Akole taluka Corona Update News satisfied

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. तालुक्यामध्ये आज केवळ दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

रविवारी एकाही बाधीताची नोंद झालेली नाही. तर आज दोन बाधित आढळून आले आहेत. आज तालुक्यात ४१ चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये एकही बाधित आढळून आला नाही. शासकीय चाचणीत एक तर खासगी चाचणीत एक बाधित आढळून आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३०६५ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात निम्रळ येथील ७८ वर्षीय महिला, कोहणे येथील ३६ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण रुग्णसंख्या ३०६५ इतकी झाली आहे.

तालुक्यातील बाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभीरे व शामराव शेटे यांनी केले आहे.    

Web Title: Akole taluka Corona Update News satisfied

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here