Home संगमनेर Sangamner: संगमनेरात किसान संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

Sangamner: संगमनेरात किसान संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

Sangamner Dharne Andolan of Kisan Sangharsh Samiti

संगमनेर | Sangamner: दिल्लीच्या चहूबाजूने तीन काळे कृषी कायदे रद्द व्हावे म्हणून गेल्या अठरा दिवसांपासून  आंदोलन सुरू आहे. किसान  संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभर प्रतिसाद मिळाला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने आज देशभर केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी(प्रांत) कार्यालयावर धरणे आंदोलन कार्यक्रम जाहीर केला होता. त्याप्रमाणे आज  संगमनेर येथे प्रांताधिकारी यांच्या कार्यालया समोर किसान संघर्ष समिती, संगमनेरच्या  वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

 यावेळी तिन्ही कृषी कायदे रद्द करा,  शेतमालाला हमी भाव देणारा नवा कायदा करा,  संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना संरक्षण देणारे  नवे कायदे करा इत्यादी मागण्या करण्यात आल्या. यावेळी साथी  सायना एनगंदुल, कॉ अनिल गुंजाळ,  साथी शिवाजी गायकवाड,  अब्दुला हसन चौधरी,  प्रा.पोपट सातपुते, निवृत्ती दातीर, शांताराम गोसावी, ऍड ज्ञानदेव सहाणे, अॅड. निशाताई शिवूरकर यांची भाषणे झाली. यावेळी सरकारच्या लोकशाही विरोधी वर्तनाचा निषेध करण्यात आला . तसेच अदानी आणि अंबानी यांच्या वस्तूंवर, जीओ सीम वर बहिष्काराचा  निर्धार करण्यात आला. 

यावेळी प्रांताधिकारी शशिकांत  मंगरूळे यांना अॅड. निशाताई शिवूरकर, कॉम अनिल कढणे, साथी सुनंदा राहणे, प्रा शिवाजी गायकवाड , अॅड. सहाणे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान कार्यालयाकडे निवेदन पाठवू असे प्रांताधिकारी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड.अनिल शिंदे, असिफ शेख, दशरथ हासे इत्यादींनी प्रयत्न केले.

Web Title: Sangamner Dharne Andolan of Kisan Sangharsh Samiti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here