Home अकोले अकोले शहराला मोठा हादरा तालुक्यात कोरोनाचा १० वा मृत्यू

अकोले शहराला मोठा हादरा तालुक्यात कोरोनाचा १० वा मृत्यू

Akole taluka coronavirus 10 th death 

अकोले | Akole: शहरातील शेकईवाडी येथील एका डॅाक्टरच्या बंधुचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्याला मोठा हादरा बसला आहे.  

अकोले शहरात चार-पाच दिवसांपूर्वी एक डॅाक्टर कोरोना बाधित आलेनंतर त्याच्या कुटुंबातील लोकांचाही अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. २० ॲगस्ट रोजी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये ५० वर्षीय शेकईवाडी येथील सदर व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. त्यानंतर खानापुर येथे उपचार सुरु असताना त्यांना ञास जाणवू लागल्याने संगमनेर येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान ह्दय विकाराने निधन झाले आहे.

त्याच्या या मृत्यू तालुक्यातील कोरोनाने बळी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढून १० झाली आहे.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३७३  झाली आहे.त्यापैकी २४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर१० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.११८ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

कोरोना झालेल्या व्यक्तीनी घाबरून जाऊ नये टेंन्शन घेऊ नये. टेन्शनमुळेच इतर घटना घडतात. प्रतिकारक शक्तीच्या बळावर कोरोनाशी मात करता येते.

पत्रकार: अल्ताफ शेख 

See Latest Marathi news

Web Title: Akole taluka coronavirus 10 th death