अकोले तालुक्यात एकाच कुटुंबातील सात, आज ८ करोनाबाधित
अकोले | Coronavirus: अकोले शहरातील महालक्ष्मी कॉलनीत एक तर धुमाळवाडीत एकाच कुटुंबातील ०७ अशी एकुण ०८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३८२ झाली आहे. कोरोनाचे आत्तापर्यंत १० बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सकाळी अकोले शहरातील शेकईवाडी येथील ५०वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोनाचा १० वा बळी गेला आहे. तर दुपारी खानापुर कोविड सेंटर येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये ०८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. यामध्ये शहरातील महालक्ष्मी कॉलनीत ३६ वर्षीय पुरुष, तर धुमाळवाडी येथील एकाच कुटुंबातील ५४ वर्षीय पुरुष, , ३१ वर्षीय पुरूष ,४८ वर्षीय महीला, ३९ वर्षीय महीला, १९ वर्षीय युवती, १७ वर्षीय युवक व ०६ वर्षाचा लहान मुलगा अशी ०८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. आढळा विभागासाठी समाधानाची बाब म्हणजे आज देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या १४ टेस्टमध्ये सर्वच्या सर्व निगेटिव्ह आल्या आहेत.तर कोतुळ ग्रामीण रूग्णालयात आज टेस्ट घेण्यात आल्या नाहीत.
तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३८२ झाली आहे.त्यापैकी २४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर१० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.१२७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
पत्रकार: अल्ताप शेख
Web Title: Coronavirus Akole taluka 8 corona infected and one death