Home अकोले अकोले: पाणलोटक्षेत्रात पाउस सुरूच, प्रवरेला पूर स्थिती

अकोले: पाणलोटक्षेत्रात पाउस सुरूच, प्रवरेला पूर स्थिती

Akole pravara River flood

अकोले: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पाउस सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.  भंडारदरा धरण ९८ टक्के आणि निळवंडे धरणात ८६ टक्के पाणीसाठा झालेला आहे. निळवंडे धरणातून १२ हजार ९४५ कुसेकने विसर्ग सुरु असल्याने प्रवरा नदीपात्राला पूर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील इंदोरी, निम्ब्रळ , कोकणेवाडी, अगस्ती पुलावरून पाणी सुरु आहे.

रविवारी सकाळी मागील २४ तासांत घाटघर येथे २५० तर रतनवाडी २२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ५९५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. निळवंडे धरण पाणीसाठा ७ हजार २०८ दशलक्ष घनफूट झाला आहे. कोतूळ येथे मुळा नदीचा विसर्ग ८ हजार ३७३ कुसेक आहे. वाकी तलावातून दोन आजार ५४५ कुसेकने विसर्ग निळवंडे धरणात जमा होत आहे. १२ हजार ९४५ कुसेकने विसर्ग निळवंडे धरणातून नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

See Latest Marathi News

Web Title: Akole pravara River flood

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here