Home संगमनेर Coronavirus:  संगमनेर तालुक्यात नवे ३० करोनाबाधितांची भर

Coronavirus:  संगमनेर तालुक्यात नवे ३० करोनाबाधितांची भर

coronavirus Sangamner Taluka 30 infected

संगमनेर | Coronavirus: संगमनेर तालुक्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३० व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. शहरात १२ रुग्ण तर ग्रामीण भागात १८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या १३५३ इतकी झाली आहे.

संगमनेर शहरात प्रवरा परिसर संतोषी माता मंदिर येथे २८ वर्षीय तरुण, वड गल्ली येथे ४७ वर्षीय तरुण, देवाचा मळा ३२ वर्षीय तरुण, जनता नगर ४२ वर्षीय महिला, इंदिरानगर ३० वर्षीय तरुण, घोडेकर मळा पाच व दोन वर्षीय मुले, अभिनव नगर येथे २७ वर्षीय महिला, खंडोबा गल्ली ५० वर्षीय व्यक्ती, कुरण रोड ७२ वर्षीय पुरुष, विद्यानगर ६४ वर्षीय व्यक्ती, कुंभार आळा ३१ वर्षीय तरुण असे १२ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील प्राप्त अहवालात घुलेवाडी येथे ७५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय व्यक्ती, ५८ वर्षीय पुरुष, २४, १८ वर्षीय तरुण, ४६,३० वर्षीय महिला, हिवरगाव पावसा ५५ वर्षीय व ४२ वर्षीय व्यक्ती, पिंपळे येथे ४१ वर्षीय तरुण, शिबालापूर येथे ४२ वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथे ६२ वर्षीय व्यक्ती, चिकणी येथे ४५ वर्षीय तरुण, सोनोशी येथे ५४ वर्षीय व्यक्ती, चितळवेढे ३० वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथे ३० वर्षीय तरुण, खांबा येथे २७ वर्षीय तरुण, मनोली येथे ५९ वर्षीय व्यक्ती असे १८ अहवाल प्राप्त झाले आहेत.

See Latest Marathi News

Web Title: coronavirus Sangamner Taluka 30 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here