Home अकोले अकोले तालुक्यात महाविकास आघाडीकडे ३९ तर भाजपकडे १२ ग्रामपंचायतीत वर्चस्व

अकोले तालुक्यात महाविकास आघाडीकडे ३९ तर भाजपकडे १२ ग्रामपंचायतीत वर्चस्व

Akole taluka Mahavikas Aghadi seats and BJP

अकोले | Akole Taluka: अकोले तालुक्यातील एकूण ५२ ग्रामपंचायतीपैकी ५१ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. ५१ ग्रामपंचायतीपैकी १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या १५ ग्रामपंचायतपैकी १३ ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे तर २ ग्रामपंचायती भाजपाकडे गेल्या होत्या.

उर्वरित ३६ ग्रामपंचायतीपैकी २६ ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे तर १० ग्रामपंचायती भाजपाकडे गेल्या. ५१ पैकी राष्ट्रवादीकडे ३१ ग्रामपंचायती तर शिवसेना ६ व कॉंग्रेसकडे २ ग्रामपंचायती तर १२ ग्रामपंचायत भाजपाकडे गेल्या आहेत.

आज पक्ष कार्यालयात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मा. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष भानुदास तिकांडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, शहर अध्यक्ष भागवत शेटे, महिला अध्यक्ष स्वाती शेणकर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी घोषित केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीना निधी देण्यात येईल. निवडून आलेल्या सदस्यांनी गावाच्या विकासाकडे लक्ष देऊन गोरगरीब जनतेची सेवा करावी असे सूचित करण्यात आले.  

Web Title: Akole taluka Mahavikas Aghadi seats and BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here