Home अकोले अकोले तालुक्यातील कळस बु येथे सर्व जागेवर भाजपचा झेंडा

अकोले तालुक्यातील कळस बु येथे सर्व जागेवर भाजपचा झेंडा

BJP flag at all places at Kalas Bu in Akole taluka

अकोले:  तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असणारी कळस बु ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार वैभवराव पिचड व  जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम समितीचे माजी अध्यक्ष कैलासराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली १३ जागेवरील सर्व उमेदवार विजयी होत ग्रामपंचायत वर भाजपा चा झेंडा फडकला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी च्या उमेदवारांचा पराभव केला.

अकोले तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे :- वार्ड नं 1सौ. संगीता रामनाथ चौधरी, श्री. जिजाबा जीवबा वाकचौरे, वार्ड नं 2 श्री. ज्ञानेश्वर अशोक वाकचौरे, सौ कमल भास्कर ढगे, श्री. केतन प्रकाश वाकचौरे वार्ड नं 3 श्री. संतोष कुंडलीक गवांदे, सौ. स्वाती जयदीप सरमाडे, सौ स्नेहल राहुल वाकचौरे वार्ड नं 4 श्री. बाळासाहेब देवराम गांडाळ, श्री.दत्तात्रय रामनाथ वाकचौरे, सौ. कल्याणी जनार्दन कानवडे वार्ड नं 5 सौ.संगिता शिवाजी सावंत,  सौ.संगिता अर्जुन भुसारी

निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून गावातील युवकांनी प्रयत्न केले कैलासराव वाकचौरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र विरोधकांनी राजकारण करण्यासाठी ही निवडणूक जनतेवर लादली त्यांना ग्रामस्थांनी जागा दाखवून दिली.

या निवडणूकित जेष्ठ नेते सिताराम वाकचौरे, कारभारी वाकचौरे, डी टी वाकचौरे, संभाजी वाकचौरे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, भाजपा चे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, सुभाष कानवडे, दौलत वाकचौरे,  सागर वाकचौरे, नामदेव निसाळ, प्रकाश आल्हाट, गणेश रेवगडे, प्रवीण वाकचौरे, सुयोग वाकचौरे, निवृत्ती मोहिते, राहुल वाकचौरे, संतोष वाकचौरे, गोरख वाकचौरे, मनोहर हुलवळे, सचिन गोपाळे, नंदू वाकचौरे, अनिल गवांदे, सोमनाथ जाधव, किरण कानवडे आदींनी विजयासाठी प्रयत्न केले.

Web Title: BJP flag at all places at Kalas Bu in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here