लोणी खुर्द येथे विखे गटाचा पराभव, विखे पाटलांना धक्का
राहता | Rahata: राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ग्रामपंचायतीचा निकाल राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. या ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव या ग्रामपंचायतीत पहायला मिळाला आहे. विके विरोधी परिवर्तन पॅनलला ११ तर विखे गटाला ६ जागा मिळाल्या आहेत.
लोणी खुर्द येथील ग्रामपंचायतीत एकूण १७ जागांसाठी निवडणूक झाली. मागील २० वर्षापासून राधाकृष्ण विखे यांच्या गटाचे वर्चस्व होते. माजी आमदार चंद्रभान घोगरे यांचे चिरंजीव जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलने ११ जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत विखे गटाला सहा जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत विखे गटाला चांगलाच धक्का मानला जातोय.
Web Title: Defeat of Vikhe group at Loni Khurd