Home अकोले अकोले: जायनावाडीत डांगी गायीने दिला तिन वासरांना जन्म

अकोले: जायनावाडीत डांगी गायीने दिला तिन वासरांना जन्म

जायनावाडीत डांगी गायीने दिला तिन वासरांना जन्म.

एम.जी.बी. प्रोजेक्ट अंतर्गत कृत्रीम रेतन.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – शेती हि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आर्थिक पाटबळ मिळण्यासाठी या शेतीला अनेक जोड व्यवसाय केले जातात. बहुतांश ग्रामीण शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणुन पशुपालन हा महत्वाचा व्यवसाय करत असतात.
अकोले तालुक्यातील अशाच एका आदिवासी दुर्गम भागातील जायनावाडी येथील काळु लिंबा भांगरे यांनी शेतीला जोड व्यावसाय म्हणून पशुपालन केले आहे. यांच्या मालकीच्या लक्ष्मी या गायीने तिन वासरांना जन्म दिला आहे.
बायफ इनस्टिट्युट फॉर सस्टेनेबल लाईव्हलीहूड अॅण्ड डेव्हलपमेंट नाशिक यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र जनुककोश प्रकल्प अंतर्गत डांगी गोवंश जनुकीय सुधारणा व संवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातुन कृत्रीम रेतनाद्वारे जायनावाडी येथील काळु लिंबा भांगरे यांच्या  दुसऱ्या वेताच्या या गायीने तिन नर जातीच्या वासरांना जन्म दिला आहे. या वासरांचे वजन चौदा किलो पर्यंत असून प्रकृती उत्तम आहे. महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ. गणेश बिडगर तसेच कृत्रीम रेतन तंत्रज्ञ बायफ अंतर्गत काम करणारे डॉ. सुनिल सदगिर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व योगदान मिळाले. या घटनेचे सर्वत्र चर्चा होत आहे.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here