Home अहमदनगर पतीनेच केले पत्नीचे अपहरण; गुन्हा दाखल

पतीनेच केले पत्नीचे अपहरण; गुन्हा दाखल

पतीनेच केले पत्नीचे अपहरण; गुन्हा दाखल

श्रीरामपुर:– तालुक्यातील भोकर येथे वडिलांकडे राहात असलेल्या विवाहितेचे तिच्या पतीनेच अपहरण केल्याची घटना काल सकाळी घडली. याप्रकरणी श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

याबाबत पोलिसांकडुन समजलेली माहिती अशी,की रेणुका अंकुश दळे हीचे सासर नेवासा तालुक्यातील तेलकुडगावात येथील आहे. चार वर्षांपासुन आई-वडिलांकडेच राहते. याप्रकरणी पती-पत्नीचे कोर्टात वाद-विवाददेखील सुरु आहे. काल सकाळी १० वाजता पती अंकुश रामराव दळे, तीचा भाया चंद्रकांत रामराव दळे, सासरा पांडुरंग सदाशिव दाते, जगन्नाथ महादेव दाते, विजय रामदास शेलार व इतर दोन अनोळखी लोकांनी रेणुका हीस मारहाण करुन बळजबरीने नांदावायला घेऊन जायचे म्हणुन गाडीत बसवले व रेणुका हीच्या आई-वडीलांना मारहाण करुन शिवीगाळ केली आणि बळजबरीने घेऊन गेले. याप्रकरणी रेणुका हीचे वडील सोन्याबापु रामचंद्र दुधाळे (वय ६४, रा.भोकार , ता. श्रीरामपुर)यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात अपहरण व मारहाण, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, असुन अंकुश दळे, चंद्रकांत जगन्नाथ दाते, विजय शेलार यांना अटक करण्यात आली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here