Home अकोले अकोले तालुक्यात बसमध्ये प्रवासी करतायत जीवघेणा प्रवास

अकोले तालुक्यात बसमध्ये प्रवासी करतायत जीवघेणा प्रवास

Akole News | Journey in a bus:  बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवाशांची वाहतूक करत असल्याने हा जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांच्या जिवावर.

Akole taluka, passengers make a fatal journey in a bus

अकोले: अकोले येथे उच्चशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसेसची वाट पाहावी लागत आहे. त्यातही येणाऱ्या बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवाशांची वाहतूक करत असल्याने हा जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकतो. भरगच्च भरलेली बस असल्याने प्रवाशांना मोठे हाल सोसावे लागत आहे. त्यासाठी अकोले आगाराने लवकर फेऱ्या वाढवून सुरक्षित प्रवासासाठी पावले उचलावीत, अशी मागणी पालकांसह प्रवाशांतून होत आहे.

आदिवासी भागात प्रवासासाठी पुरेशी साधनेही उपलब्ध नाहीत. विद्यार्थी शाळेसाठी लगबग करतायत. सणासुदीचे दिवस, अवकाळी पावसाने नागरिक त्रस्त असल्याने बसनेच प्रवास करावा लागतो. सद्यःस्थितीत गणोरे, देवठाण, राजूर आदी मार्गावर बसच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Akole taluka, passengers make a fatal journey in a bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here