Home अकोले अकोले: ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळली

अकोले: ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळली

Akole Accident  News: रस्त्याला कठडे नसल्याने अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. (Ahmednagar)

Akole Accident After losing control, the car fell into the valley

अकोले:  अकोले तालुक्यातील चिचखांड या घाटात आज सकाळी सात ते आठच्या दरम्यान डॉ. प्रवीण गंगाराम कवडे (वय ४०) हे अकोल्याहून कोतुळकडे जात असताना चिचखंड घाटामध्ये त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळली. त्यामुळे ही गाडी खोलदरीत गेली. ही घटना सकाळच्या वेळी झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

रात्रीच्या वेळी असा अपघात घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या रस्त्याच्या साईट पट्ट्या व घाटलगत रस्ता असल्याने साईट बांधकाम नाही व दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे अनेक वाहनांची या अगोदर देखील अपघात झालेले आहेत.

प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्ता गेल्या दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजनेतून पूर्ण करण्यात आला असला तरी या रस्त्याने अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ऊसाची वाहतूक केली जाते. मात्र उसाची वाहतूक करत असताना अनेक वाहनांना मोठा उतार असल्याने ब्रेक लागणे अवघड आहे.

अनेक वाहनांचे असे प्रकार अपघाताची घडले असून याकडे मात्र कोणाची लक्ष जात नाही. तरी प्रशासनाचे याकडे लक्ष जाईल का? असा देखील प्रश्न या भागातील शेतकरी व नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

अकोले ते कोतुळ हा रस्ता गेल्या चार ते पाच वर्षांपासून पिंपळगाव खांड धरणाचे पाणी अडवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद झाली आणि पर्यायी मार्ग म्हणून धामणगाव पाट ते कोतुळ ते अकोले असा मार्ग सुरू झाला. मात्र या मार्गाने प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Akole Accident After losing control, the car fell into the valley

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here