Home Accident News अकोले तालुक्यात ट्रॅक्टर पलटी होऊन तरुणाचा मृत्यू

अकोले तालुक्यात ट्रॅक्टर पलटी होऊन तरुणाचा मृत्यू

अकोले: अकोले तालुक्यातील आंबड येथे ट्रॅक्टर उलटून अपघात झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर उलटून अपघात घडला यात तरुणाचा मृत्यू झाला आहे.

देविदास धोंडीबा जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देविदास जाधव हे आपल्या चुलत मामाचा ट्रॅक्टर घेऊन शेतीला रोटा मारण्यासाठी जात असताना आंबड येथील एका रस्त्यावर ट्रॅक्टर स्लीप होऊन त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यालगत असलेल्या पंधरा फुट खड्ड्यात जाऊन उलटला. ते ट्रॅक्टरखाली दाबले गेले. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टर बाजूला केला. त्यांना तातडीने अकोलेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा अगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.  

Website Title: Akole Taluka Young man dies after tractor overturns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here