Home अहमदनगर संगमनेर शहरात एक तर जिल्ह्यात १२ करोनाबाधित आढळले

संगमनेर शहरात एक तर जिल्ह्यात १२ करोनाबाधित आढळले

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज १२ करोना रुग्ण आढळून आले आहेत. यात संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा येथील एक रुग्ण आढळून आला आहे. संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १२७ झाली आहे.

नगर तालुक्यात नवनागापूर येथे तीन, नगर शहरात पदामानगर येथे दोन, श्रीरामपूर येथे एक, गवळीवाडा भिंगार येथे दोन, खेरडा पाथर्डी येथे दोन, राहता येथील एक या रुग्णांचा समावेश आहे. असे आज बारा रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण करोना बाधितांची संख्या ५९० झाली आहे. आज ६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Web Title: Coronavirus Ahmednagar Sangamner corona update today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here