तृतीयपंथीवर चाकू हल्ला, रिक्षाचालकाला अटक
जळगाव: तृतीयपंथीवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी हेमंत गुजर या रिक्षाचालकास शहर पोलिसांनी अटक केली आहे. या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तृतीयपंथी अर्चनाजान या सहकारी राशीजान, कल्याणीजान व जमंनाजान अशा गोलांनी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर एकत्र राहतात. ते बाहेर जायचे असल्यास सर्व जण रिक्षाचालक हेमंत नानकराम गुजर यालाच बोलावीत असतात. असेच तीन जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान या चौघीना बाहेर जायचे असल्याने त्यांनी हेमंतला बोलाविले. यावेळी या रिक्षाचालकाने मद्य प्राशन केले होते. तो मद्याच्या नशेत होता.
यावेळी अर्चनाजान याने मद्य प्राशन का केले असे विचारले असता त्याला राग आल्याने शिविगाळ व अर्चनाजानच्या छातीवर चाकूने वार केले. यात अर्चनाजान गंभीर जखमी झाली होती.
रिक्षाचालकाने प्राणघातक हल्ला केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृतीयपंथीवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी हेमंत गुजर या रिक्षाचालकास शहर पोलिसांनी अटक केली आहे.
Website Title: News Knife attack rickshaw puller arrested