Home अकोले अकोले: चास पिंपळदरी येथे नदीत पडून तरुणाचा मृत्यू

अकोले: चास पिंपळदरी येथे नदीत पडून तरुणाचा मृत्यू

अकोले: चास पिंपळदरी येथे नदीत पडून तरुणाचा मृत्यू

चास: अकोले तालुक्यातील चास पिंपळदरी येथील मुळा नदीवरील केटीवेअरवरून आपल्या मोटारसायकलने जात असताना एका आदिवासी तरुणाचा २५ फुट खोल मुळा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

वामन गेनू दुधवडे वय ३४ रा. पिंपळदरी हा तरुण चास गावी टेलरिंग काम करण्यासाठी याच केटीवेअरवरून ये जा करत होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आपले दुकान बंद करून सायंकाळी ७:३० च्या सुमारास आपले दुकान बंद करून चास वरून पिंपळदरीकडे आपल्या एम.एच. १७ के. ४५०९ या मोटारसायकलवरून जात असताना त्याचा तोल जाऊन तो केटीवेअर वरून २५ फुट खोल मुळा नदीपात्रात पडल्याने डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला. त्याची गाडी मात्र केटीवेअर वरच पडलेली असल्याने येणाऱ्या जाणार्यांनी खाली पहिले असता घडलेल्या घटनेची त्यांना कल्पना आली. काही ओळखीच्या माणसांनी त्याच्या घरी फोन द्वारे हि माहिती दिल्यावर तेही तत्काळ घटनास्थळी हजार झाले.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व सहकारी पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शवविचेदनासाठी मृतदेह अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.    

Website Title: Akole Youth fall into the river


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here