Home अहमदनगर Anna Hazare: अण्णा हजारे यांचे आंदोलन स्थगित

Anna Hazare: अण्णा हजारे यांचे आंदोलन स्थगित

Anna Hazare's agitation postponed

पारनेर  | Parner:  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare)यांनी सोमवार दि. 14 फेब्रुवारी  पासुन पुकारलेले आंदोलन ग्रामसभेच्या निर्णयानंतर स्थगित केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने किराणा दुकानासह वाईन विक्री  खुली केल्याने राज्यात संतापाची लाट उसळत होती.  यामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा धार्मिक क्षेत्र, राजकीय पक्ष, सामाजिक संघटनानी मोठा विरोध केला. तरीही राज्य सरकार वाईन विक्रीचा निर्णय मागे घेत नव्हते.

त्यामुळे अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ दिवसात तीन पत्र पाठवले. सोमवार दि. 14 फेब्रुवारीपासुन यादवबाबा मंदीरात आंदोलनाचा इशारा जाहीर केला होता. अण्णा हजारेंनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यावर सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या. शनिवारी दुपारी पोलिस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील  व वरीष्ठ भेटीला आले होते. शनिवारी रात्री उशीरा राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी अण्णांची मनधरनी करत काही नव्या सुधारणा सांगितल्या व आंदोलन न करण्याची विनंती केली. यावेळी अण्णांनी उद्या ग्रांमसभेत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्याप्रमाणे रविवारी सकाळी यादवबाबा मंदीराच्या प्रांगणात ग्रामसभा होऊन ग्रामस्थांच्या आग्रहखातीर  सोमवारी होणारे आंदोलन स्थगित केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त, उपायुक्त, नगरचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये सुमारे अडीच तास सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. चर्चेअंती या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.

1) किराणा दुकानातून दारूची विक्री करण्यात येणार नाही.

2) वाईन विक्रीच्या नवीन धोरणाचा निर्णय जनतेला विचारून घेण्यात येईल.

3) वाईन विक्रीच्या प्रस्तावित धोरणाच्या निर्णयाला माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील.

4) जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

5) नागरिकांच्या सूचना व हरकती आल्यानंतर सरकारकडून त्या विचारात घेऊन यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल.

Web Title: Anna Hazare’s agitation postponed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here