Home देव धर्म आषाढी एकादशीचे महत्व व धार्मिक कथा

आषाढी एकादशीचे महत्व व धार्मिक कथा

आषाढी एकादशीचे महत्व व धार्मिक कथा 

आषाढी एकादशीला देवशायनी एकादशी म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढी महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होते. म्हणजेच देवांची रात्र सुरु होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी असे म्हणतात.

देवांच्या या निद्रकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून स्वतः चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे आवश्यक आहे.

पूजाविधी: या दिवशी श्री विष्णूची ऋश्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

पंढरपूरची वारी: वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्व आहे.

हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून ठिकठिकानाहुन लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वर माउली तर देहू तुकारामांची, त्रीम्बेकेश्वर निवृत्तीनाथांची, पैठण एकनाथांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते.

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिली आहे, ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.

पौराणिक काळी मृदू मान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडून मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदू मान्य राक्षस देवावर स्वारी करतोय त्यांचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व टी मृदू मान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाउस पडत असल्याने सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला.

परस्परांवर प्रेम करणे, प्राणी मात्र अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्या देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे. या आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल !


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Fashion
खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here