Home अकोले अकोले: लिंगदेव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

अकोले: लिंगदेव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

अकोले: लिंगदेव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

अकोले: अकोले तालुक्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या लिंगदेव या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुडगूस घालत रामभाऊ महादू हाडवळे यांच्या राहत्या घरातून साडे तीन लाख रुपयांच्या रोख रकमेसह सहा तोळे सोने असे एकूण आठ ते नऊ लाख रुपयांचे ऐवज लांबविले.

Fashion Ad

तर यांचा यावरचा मोह आवरला नाही तर यांनी अनुक्रमे इतर चार ते पाच ठिकाणी चोरी  करण्याचा पप्रयत्न केला. तसेच  गावाजवळ राहत असलेल्या सूर्यभान महादू घोमल यांच्या घराकडे मोर्च्या वळविला. परंतु तेथे त्यांना काहीही मिळाले नाही म्हणून त्यांनी अनुक्रमे गावातील स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे मोर्चा वळविला व तेथे मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून व नंतर मंदिरात असणाऱ्या दान पेटीचे कुलूप तोडून त्यात असलेली रक्कम लांबवून ही दान पेटी गावाजवळील उत्तरेच्या तलावाकाठी फेकून देऊन त्यांनी आपला मोर्चा गावातील साई ट्रेडिंग या दुकानाकडे नेला व दुकानाला असणाऱ्या शटरचे पाच ते सहा कुलुपे तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु हे दुकान वरदळीच्या ठिकाणी असल्यामुळे तेथून त्यांना आपला काढता पाय घ्यावा लागला.

सदर घटनेची खबर लागताच अकोले पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here