Home क्राईम ऑटोचालक रात्री ऑटो घेऊन गेला तो परतलाच नाही, सकाळी धक्कादायक घटना उघडकीस

ऑटोचालक रात्री ऑटो घेऊन गेला तो परतलाच नाही, सकाळी धक्कादायक घटना उघडकीस

Nagpur Crime: सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका ऑटो चालकाची हत्या (Murder) करण्यात आली, दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले. एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला.

Auto driver was murder, stoned to death

नागपूर : राजकुमार यादव हे ऑटोचालक आहेत. ते रात्रीच्या वेळी सीताबर्डी परिसरात ऑटो चालवतात. नेहमीप्रमाणे हे ऑटो घेऊन घरून गेले. पण, पहाटे घरी परतलेच नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. राजकुमार घरी का आले नसावेत, याची घरच्यांना चिंता लागली. तेवढ्यात त्यांना दुःखद घटना कळली. सकाळी राजकुमार यांचा मृतदेह दिसून आला. त्यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले.

राजकुमार यादव असे मयत ऑटो चालकाचे नाव (वय 50 वर्षे) आहे. सीताबर्डी येथील हनुमान गल्लीच्या गुजरात हॉटेलच्या जवळ ही घटना घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका ऑटो चालकाची हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास गुजरात हॉटेलसमोर एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. एका अज्ञात आरोपीने डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरचा सीताबर्डी परिसर हा नेहमी गजबजलेला परिसर असतो. हे मोठं मार्केट असून या ठिकाणी गर्दी असते. मात्र याच मार्केट परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली. दिवस उजाडताच या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतक हा ऑटो चालक असल्याचं पुढे येत आहे. तो रात्रीच्या वेळी ऑटो चालवायचा. मात्र याची हत्या कोणी आणि का केली याचा शोध आता पोलीस येत आहे. अशी माहिती डीसीपी राहुल मदने यांनी दिली.

Web Title: Auto driver was murder, stoned to death

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here