Home संगमनेर संगमनेर: समनापूर शिवारात जिवंत एक दिवसाचे अर्भक आढळले

संगमनेर: समनापूर शिवारात जिवंत एक दिवसाचे अर्भक आढळले

baby was found alive in Samanapur Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारातील जेडगुले वस्ती येथे एक दिवसाचे पुरुष जेन्डरचे जिवंत अर्भक सोमवारी सकाळी १० वाजता आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समनापूर शिवारातील जेडगुले वस्ती  येथे काटवनात एक दिवसाचे अर्भक निपचित पडलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आले. त्यांनी लगेचच पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांना कळविले. त्यांनी  सदर माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पो. ना. सुभाष बोडखे यांनी घटनास्थळी भेट देत मुलाचे अर्भक ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन हे करीत आहे.

Web Title: baby was found alive in Samanapur Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here