Home अहमदनगर प्रतिष्ठित डॉक्टरच्या नावे बनावट दस्तावेज बनवून ५० लाखांचे कर्ज मागितले

प्रतिष्ठित डॉक्टरच्या नावे बनावट दस्तावेज बनवून ५० लाखांचे कर्ज मागितले

Ahmednagar loan of Rs 50 lakh by forging documents in the name of a doctor

अहमदनगर | Ahmednagar: नगर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरच्या नावे बनावट दस्तावेज तयार करून बजाज फायनान्सकडे ५० लाख रुपयांचे कर्ज प्रकरण करून पैसे लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला औरंगाबाद सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

तेजस प्रमोद मोगले (वय ३२ रा. सिडको महानगर, औरंगाबाद), शुभम रमेश नंद्गवळी (वय २६ रा. गुलमंडी औरंगाबाद) अमोल सतीश सोनी (वय ३३ रा. बसवंतनगर औरंगाबाद), सतीश बापू खांदवे (वय २७ रा. वाकोडी अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. न्यायालयाने या चौघांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तेजस मोगले याने इतर तिघांना हाताशी धरून फिर्यादी डॉक्टरच्या नावाने ईमेल आय डी तयार करून डॉक्टरच्या नावाने कागदपत्रांचा दस्तावेज तयार करून सिमकार्ड घेतले. त्यानंतर याच बनावट कागद पत्रांच्या आधारे बजाज फायनान्स कंपनीकडे अर्ज केला. तब्बल ५० लाख रुपयांची मागणी या अर्जात करण्यात आली. कर्ज मंजूर करण्यापूर्वी कंपनीकडून पडताळणीसाठी डॉक्टरला संपर्क केल्यानंतर हे बनावट कर्ज प्रकरण असल्याचे समोर आले. त्यांनतर त्या डॉक्टरने २५ फेब्रुवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सायबर पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक तपास करीत तेजस मोगले व त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. तेजस मोगले हा बजाज फायनान्स कंपनी नगर कार्यालयात नोकरीस होता. त्याने काही महिन्यांपूर्वी काम सोडले. त्याला पैशाची गरज भासल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने बनावट कर्जप्रकरण बनवून पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Ahmednagar loan of Rs 50 lakh by forging documents in the name of a doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here