Home अहमदनगर चोरीचे सोने घेणारा सराफासह चोरटा जेरबंद, २५ तोळे जप्त

चोरीचे सोने घेणारा सराफासह चोरटा जेरबंद, २५ तोळे जप्त

Ahmednagar Thief arrested with stolen gold bullion

अहमदनगर | Ahmednagar:  नगर तालुक्यात व पारनेर परिसरात धुमाकूळ घालणारा चोरटा व त्याच्याकडून विकत घेणारा सराफ या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ३२ हजार रुपयांचे २५ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

भगवान ईश्वर भोसले वय २१ रा. बेलगाव कर्जत व सराफ रामा अभिमन्यू इंगळे रा. शिरूर कासार बीड या दोघांना अटक केली. भोसले याने एम आय डी सी व पारनेर परिसरातील पाच घरफोड्या व जबरी चोरीची कबुली दिली आहे.

नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथे चार दिवसांपूर्वी रीमा वालचंद धाडगे यांच्या घराचे कुलूप तोडून २ हजार रुपयांचे ऐवज चोरीला गेला होता. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे हे करीत होते. याच तपासात भगवान भोसले व त्याचा भाऊ संदीप ईश्वर भोसले हे दोघे चोरीचे सोने विकण्यासाठी शिरूर कासार येथील सराफाकडे जात असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली त्यानुसार त्यांनी सापळा रचला. भगवान व संदीप हे दोघे मोटारसायकलवरून येत असतानाचा पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. मात्र संदीप मोटारसायकल सोडून पळून गेला. भगवान याच्याकडून ७ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याने चोरीचे सोने शिरूर कासार येथील रामा इंगळे यास विकल्याची कबुली दिली. रामा इंगळे याच्याकडून आणखी  ७ लाख ६० हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोने जप्त करण्यात आले.  

Web Title: Ahmednagar Thief arrested with stolen gold bullion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here