Home क्राईम संगमनेरमध्ये गोमांस जप्त, शहर पोलिसांची कारवाई

संगमनेरमध्ये गोमांस जप्त, शहर पोलिसांची कारवाई

Beef confiscated in Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गोवंश जनावरांची कत्तल सुरु असलेल्या पत्र्याच्या वाड्यात कारवाई करत ३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. शहरातील जमजम कॉलनी येथे मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवेज कुरेशी रा, जमजम कॉलनी संगमनेर व फरमान मुने कुरेशी रा. भारत नगर संगमनेर या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सोनवणे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक रमेश लबडे हे करीत आहे.

Web Title: Beef confiscated in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here