Home अहमदनगर अल्पवयीन मुलीला धमकी देत बलात्कार, आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीला धमकी देत बलात्कार, आरोपी अटकेत

Parner Accused arrested for threatening to rape

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता आरोपीने धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध धमकी देवून बळजबरीने बलात्कार केला.

हिरामण संभा तिखोळे रा. वडगाव सावताळ ता. पारनेर असे या आरोपीचे नाव आहे. जर तू कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन असे धमकी दिली होती. धमकी देत याने मुलीवर अत्याचार करत असे यातूनच तिचे पोट दुखू लागल्याने आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने हिरामण तिखोळे याने अत्याचार केल्याचे सांगितले.

याप्रकरणी पिडीतेच्या आईने पारनेर पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपी हिरामण संभा तीखोळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हिरामण संभा तीखोळे यास पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघ हे करीत आहे.

Web Title: Parner Accused arrested for threatening to rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here