Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट

Sangamner bus took off on the Nashik-Pune highway

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातून जात असणाऱ्या मिरज आगाराची बसने पुणे नाशिक महामार्गावर घारगाव येथील पुलावर अचानक शोर्टसर्किटमुळे बसच्या  खालील बाजूस पेट घेतला. 

यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आग विझविल्याने बसमधील २६ प्रवासी बचावले आहे.

बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेऊन तरुणांनी मातीने व पाण्याने आग विझविली.

नाशिक येथून संगमनेर मार्गे मिरज येथे बस जात होती. ही बस(एम.एच. १४, बी.टी. ४८९९) मिरज आगाराची होती. या बसमध्ये अमोल ज्ञानेश्वर नांदुरकर  हे चालक व वाहक आणि २६ प्रवासी प्रवास करत होते.

गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील पुलावरून ही बस जात असताना दुचाकी स्वरांनी बसला खालच्या बाजूने आग लागल्याचे सांगितले. हे समजताच चालकाने बस बाजूला घेऊन प्रवाशांना सुरक्षित बाजूला उभे केले. तरुणानी माती व पाणी टाकत हि आग विझविली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाले आहेत. बस चालकाच्या सावधानतेमुळे बसमधील २६ प्रवासी बचावले आहेत.  

Web Title: Sangamner bus took off on the Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here