Home अहमदनगर टेम्पोच्या धडकेत फुल विक्रेता ठार

टेम्पोच्या धडकेत फुल विक्रेता ठार

Ahmednagar Flower seller killed in tempo crash

केडगाव | Ahmednagar:नगर औरंगाबाद जेऊर शिवारात शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात निलेश मच्छिंद मेहेत्रे वय ३० रा, जेऊर ता. नगर हा जागीच ठार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जेऊर शिवारातील टोलनाक्यावर निलेश मेहेत्रे व टाचा भाऊ गोरख मेहेत्रे फुल व हार विक्रीचा व्यवसाय करत असत. नगरहून औरंगाबादकडे जाणारा टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो टोलनाक्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षण कठड्याला धडकून उलटला. याच दरम्यान कठड्या जवळ हार विकण्यासाठी उभा असलेला निलेश मेहेत्रे याला जबर मार लागल्याने झाला. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचारी यांनी अपघातग्रासताना मदत केली. या घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला आहे. एम आय डी सी पोलीस स्टेनच्या कर्मचारी यांनी पंचनामा केला. पोलिसांनी महामार्ग वरील वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. निलेश मेहेत्रे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Ahmednagar Flower seller killed in tempo crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here